आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलाकारांचा मस्ती मूड:'डॉक्टर डॉन'च्या सेटवर झाली खास 'पावरी', देवदत्त नागेने व्हिडिओ शेअर करत म्हटले...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'पावरी चल रही है' या ट्रेंडला अनुसरून देवदत्त नागेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मीडियावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय.

डॉक्टर डॉनच्या सेटवर कलाकारांची धमालही चालूच असते. ऑनस्क्रीन हे कलाकार जेवढा कल्ला करतात तितकंच ऑफस्क्रीन देखील त्यांची मस्ती चालू असते. सध्या सोशल मीडियावर चालत असलेल्या 'पावरी चल रही है' या ट्रेंडला अनुसरून देवदत्त नागेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सेटवरच्या आवारात असलेल्या बोराच्या झाडावरून डॉक्टर डॉनची टीम बोरं काढतेय. यावर देवदत्त नागेने "ये हम है, ये हमारी शूटिंग की पोरं है, और ये हमारी बोरं की पावरी चल रही है" असं म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांमध्ये एकच हास्याची लहर उठली आहे. या धमाल व्हिडिओवर प्रेक्षक-चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...