आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैवाहिक आयुष्य संकटात:अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नी स्नेहाची पोलिसांत तक्रार, कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात स्नेहा विश्वासराव हिने तक्रार दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यासह त्याच्या आई- वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासराव हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात स्नेहाने तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासरावने पती अनिकेत विश्वासराव याने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षांच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असे म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेतची पत्नी स्नेहा ही देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. स्नेहा आणि अनिकेत यांनी 'हृदयात वाजे समथिंग समथिंग' या चित्रपटात एकत्र काम केले होते. स्नेहाने स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' या चित्रपटात भूमिका केली होती. डिसेंबर 2018 मध्ये अनिकेत आणि स्नेहा यांचे लग्न झाले होते.

असे ठरले होते स्नेहा आणि अनिकेतचे लग्न
एका मुलाखतीत स्नेहाने त्यांचे लग्न कसे ठरले याविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती की, आमचे अरेंज मॅरेज आहे. आमचे अफेयर वगैरे काहीच नव्हते. तसेच आम्ही एकमेकांना डेटदेखील केले नव्हते. आमच्या लग्नाबाबतचे जून 2018 महिन्यात ठरले होते. त्यावेळी आम्ही एक चित्रपट नुकताच एकत्र केला होता. त्यापूर्वी आम्ही एकमेकांना फक्त ओळखत होतो. तेव्हा आम्ही सहकलाकार व फ्रेंड्स इतकेच नाते आमच्यात होते. माझ्या घरातले माझ्यासाठी जानेवारीपासून मुलगा शोधत होते. अनिकेतची मावशी आमच्या सोसायटीत राहते. तर मावशी व आई मैत्रीणी असल्यामुळे त्यांचे यासंदर्भात बोलणे झाले. मावशीने माझा अनिकेत नामक पुतण्या आहे. त्याच्यासाठीदेखील मुलगी बघत आहेत. त्याच्याशी बोलून पाहू का? आणि अशाप्रकारे आमच्या लग्नाबाबतचे असे अचानकच ठरले. माझी व त्याची आई एकमेकांशी बोलले. मग, आम्ही दोघे फोनवर बोललो. आम्ही विचार केला की अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा आपण एकमेकांना ओळखतो व एकाच क्षेत्रातील आहोत तर लाइफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार नक्कीच करू शकतो.

पल्लवी सुभाषसोबत रिलेशनशिपमध्ये होता अनिकेत
अनिकेत अभिनेत्री पल्लवी सुभाषसोबत एकेकाळी सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. पण काही वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

बातम्या आणखी आहेत...