आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘देवमाणूस’:डॉ. अजित कुमार देव आणि डिम्पलची लगीनघाई, देवी सिंगच्या अटकेची उत्सुकता, पुरावे ACP दिव्याच्या हाती!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.

अजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागते. इकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय. अजित अस्वस्थ आहे. सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे. आता जशी ह्या लग्नाची उत्सुकता आहे, तशीच देवीसिंगला अटक कधी होणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय, तसंच डॉ. सोबत डिम्पल ला सुद्धा पोलीस ताब्यात घेणार का?

बातम्या आणखी आहेत...