आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
याच दरम्यान प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे डॉ. अमोल कोल्हे 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत एक खास भूमिका साकारणार आहेत. 2 सप्टेंबरपासून डॉ. अमोल कोल्हे या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याबद्दल त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. पण भूमिकेबद्दलचा खुलासा करणे मात्र त्यांनी टाळले आहे.
मालिकेतील लूकचा फोटो शेअर करुन त्यांनी कॅप्शन दिले, ''अ सरप्राईज! साधारण ८ महिन्यांनंतर पुन्हा... दिनांक 2 सप्टेंबर पासून.... "स्वराज्यजननी जिजामाता" सोनी मराठी वाहिनीवर रात्रौ 8.30 वाजता! ...जय शिवराय!''
View this post on InstagramA post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe) on Sep 1, 2020 at 7:40am PDT
एकंदरीतच पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे यांना छोट्या पडद्यावर बघण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच आतुर असणार हे काही वेगळे सांगायला नको.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.