आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रिटी गणेशा:देवदत्त नागेने अलिबागला जाऊन साजरा केला गणेशोत्सव, म्हणाला - बाप्पाचा आशीर्वाद सदैव पाठीशी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवदत्तने आपल्या गावी अलिबागला जाऊन गणेशोत्सवाचा सण साजरा केला.

खंडेरायाच्या गाजलेल्या भूमिकेनंतर डॉक्टर डॉन या मालिकेतून देवाच्या व्यक्तिरेखेने अभिनेता देवदत्त नागे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतोय. डॉक्टर डॉन मधील देवा भाईवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. डॉक्टर डॉन या मालिकेच्या सेटवर गणेश चतुर्थी निमित्त 2 दिवसाची सुट्टी कलाकारांना मिळाली त्यामुळे देवदत्तने अलिबागला जाऊन हा सण साजरा केला.

गणेशोत्सव हा देवदत्तचा आवडता सण आहे आणि त्याच्या या लाडक्या सणाबद्दलच्या आठवणी सांगताना देवदत्त म्हणाला, "माझं बालपण पेणमध्ये गेलं आणि पेण हे गणपती बाप्पाच्या मुर्तींचं माहेरघर मानलं जातं. लहानपणापासून मी आजबाजूला बाप्पाच्या मुर्ती घडताना पाहिल्यात. मी स्वतः बाप्पाची मुर्ती बनवायचो. पण मला बाप्पाचा सर्वात मोठा आशिर्वाद मिळाला तो माझ्या खंडेरायाच्या भुमिकेमधून. ही मालिका मला मिळाली आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे मी आजूबाजूला कितीतरी मोठ मोठ्या खंडेरायारुपी बाप्पाच्या मुर्ती घडताना पाहिल्यात. माझ्या स्वतःच्या घरामध्ये सलग तीन वर्ष मी खंडेरायरुपी गणपती बाप्पा विराजमान केले. आज जेव्हा या आठवणी तुम्हाला सांगतो तेव्हा ही मन कृतार्थ होतं. अशा बाप्पाच्या अनेक आठवणी मी माझ्या ह्रदयात कायमस्वरुपी सांभाळून ठेवल्यात."