आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'चला हवा येऊ द्या'नंतर डॉ. निलेश साबळे आता झी युवा वाहिनीवरील नवाकोरा शो 'लाव रे तो व्हिडीओ'चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे निलेश साबळे घरच्या घरी या मालिकेचं शूटिंग करत आहेत. घरात शूटिंग करणं ही तारेवरची कसरत आहे.
निलेशने त्याच्या पत्नीच्या मदतीने ही कसरत कशी पार पाडली? कॅमेराचा अँगल सेट करण्यापासून ते लाईट ऍडजस्ट करून सिन कसे शूट केले या बद्दल सांगितले. तो म्हणाला, सध्या घरात मी आणि माझी पत्नी डॉ. गौरी असे आम्ही दोघेच आहोत. त्यामुळे सेटअप उभा करण्यापासून ते शूटिंग करेपर्यंत सगळं आम्हा दोघांनाच करायचं होतं, असे त्याने सांगितले.
पुढे निलेश म्हणाला, 'लाव रे तो व्हिडीओ' हा तळागाळातील अतरंगी टॅलेंट हुडकून काढणारा कार्यक्रम करायचं झी युवा च्या साथीन आम्ही ठरवलं. घराचं रूपांतर स्टुडिओमध्ये करण्यापासून आमची सुरुवात होती. प्रोफेशनल कॅमेरे, लाईट बोर्ड, वायर्स, माईक हे सगळं मागवलं. त्यातल्या प्रत्येक गोष्टीच निर्जंतुकीकरण करण्याच्या एक महत्वाचा कार्यक्रम पार पडला. सध्या डॉ. गौरी हे कॅमेरामन आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत असते. बऱ्याचदा शूटिंग करताना रात्र कशी निघून जाते हे आम्हा दोघांना कळत देखील नाही, असे निलेशने सांगितले.
झी युवा वाहिनी वर 1 जुलै पासून बुधवारी आणि गुरूवारी येणाऱ्या 'लाव रे तो व्हिडीओ'मध्ये निलेश साबळे आणि विकास जायफळे ( VJ ) दोन भूमिकांमधून ग्रामीण विरुद्ध शहरी यांच्यातील मजा पाहायला मिळेल. महाराष्ट्रातल्या हौशी कलाकारांची सादरीकरण खरोखरच वाखाणण्याजोगी आहेत. या निमित्ताने मला अनेक गोष्टींचा बारीक सारीक अभ्यास करून खूप काही शिकता आले, असे निलेश म्हणाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.