आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा शो:डॉ. निलेश साबळेंचा 'लावा रे तो व्हिडिओ' या तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला  

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा खास शो, एका खास दिवशी सुरु होणार आहे, असं सुद्धा म्हणायला हरकत नाही.

लॉकडाऊनमध्ये आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर एक नवाकोरा, जबरदस्त कार्यक्रम सुरु होणार आहे. 'लाव रे तो व्हिडिओ' हा कार्यक्रम 1 जुलैपासून, दर बुधवार आणि गुरुवार आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करेल. प्रेक्षकांचे लाडके निलेश साबळे यांची उपस्थिती आणि प्रेक्षकच करणार असलेले प्रेक्षकांचे मनोरंजन, याव्यतिरिक्त इतरही अनेक विशेष गोष्टी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. असा हा खास शो, एका खास दिवशी सुरु होणार आहे, असं सुद्धा म्हणायला हरकत नाही.

1 जुलैला या कार्यक्रमाचा पहिला भाग 'झी युवा' वाहिनीवर रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होईल. डॉ. निलेश साबळे यांची सूत्रसंचलनाची खुमासदार शैली आता 'झी युवा'वर सुद्धा अनुभवता येईल. 'डॉक्टर्स डे'च्या दिवशी, डॉ. निलेश साबळे, हे खास सरप्राईज आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहेत.  'डॉक्टर्स डे'च्या मुहूर्तावर सुरु होणार असलेला हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठीच एक अनोखी भेट ठरणार आहे. 

निलेश साबळे, यांचा 30 जून रोजी वाढदिवस आहे. अशावेळी एक खास गिफ्ट, ते आपल्याकरिता घेऊन येत आहेत. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना, 'डॉक्टर्स डे'च्या मुहूर्तावर, डॉ. निलेश साबळे, आपल्या सगळ्यांना हसवण्याचे काम सुरू करणार आहेत. त्यांच्या यंदाच्या वाढदिवसाची भेट, ते त्यांच्या चाहत्यांसह सगळ्यांसाठी 'लाव रे तो व्हिडिओ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...