आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कामावर परतली सायली:'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाचं डबिंग सुरू, कलाकारांकडून सर्व नियमांचं पालन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • "गोष्ट एका पैठणीची"साठी सायली रमली डबिंगमध्ये

राज्य शासनाकडून मनोरंजन क्षेत्राला टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटानं पूर्णत्त्वाच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. या चित्रपटातील कलाकारांकडून सर्व नियमांचं पालन करून, काळजी घेऊन डबिंग सुरू करण्यात आलं आहे. नुकतेच अभिनेत्री सायली संजीवने आपले डबिंग पूर्ण केले.

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकार आपल्या भेटीस येणार असून अन्य कलाकार मंडळींची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. 

करोना विषाणू संसर्गापूर्वी 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे पोस्ट प्रॉडक्शनचं काम करता येत नव्हतं. मात्र आता शासनाकडून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करूम काम करण्यास परवानगी दिली जात आहे. त्यामुळे चित्रपटाचं पोस्ट पॉडक्शन सुरू झालं आहे. चित्रपटातील कलाकार काळजी घेऊन डबिंग करत आहेत. त्यामुळे आता लवकरच या चित्रपटाचं उर्वरित तांत्रिक कामही पूर्ण होऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज होईल. 

View this post on Instagram

गोष्ट एका पैठणीची....

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on May 11, 2020 at 6:39am PDT

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळाला होता. पैठणीच्या एका हळूवार स्वप्नाची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे.