आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा विशेष:बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज होणार सेलिब्रेशन, 'आईचा जोगवा मागेन' या गाण्यावर थिरकणार स्पर्धक

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन तासांचा विशेष भाग आज रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहे.

आज बिग बॉस मराठी रहिवाशी संघातील सदस्यांना मिळणार आहे खास सरप्राइज. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असणार आहे खास सेलिब्रेशन. घरातील सदस्य सुंदर तयार झाले असून धमाल मस्ती होणार आहे. कारणसुध्दा तसेच आहे. आज दसराच्या दिवशी बिग बॉस सदस्यांचा हा दिवस खास बनवणार आहेत. वाद विवाद, भांडण, घरात पडलेले गट सगळं विसरून बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य एकत्र येऊन या सेलिब्रेशनचा भाग होणार आहेत.

'आईचा जोगवा मागेन' या गाण्यावर महिला सदस्य अप्रतिम नृत्य देखील सादर करणार आहेत. 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाची राजगायिक अक्षया अय्यर आणि 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचा स्पर्धक विश्वजित बोरवणकर हे त्यांच्या सुरेल आवाजात एक से बढकर एक गाणी सादर करणार आहेत.

सर्व सदस्य मोठया उत्साहात सेलिब्रेट करताना दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...