आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नुकतेच लग्नाच्या बंधनात अडकले. त्यांच्या विवाहसोहळ्यात हळद, मेंदी, संगीत सोहळ्यानंतर लग्न आणि वेडिंग रिसेप्शन असे विविध कार्यक्रम पार पडले. दोघांच्या वेडिंग रिसेप्शनला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
अक्षया आणि हार्दिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. परंतु, त्यांना विवाहसोहळ्याला उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्यांनी फोनवरच हार्दिक-अक्षयाला शुभेच्छा दिल्या. रिसेप्शन सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हार्दिक-अक्षयाच्या रिसेप्शन सोहळ्यातील हा व्हिडिओ ‘फिल्मवाला’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. अक्षयानेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
2 डिसेंबर रोजी अतिशय थाटामाटात हार्दिक आणि अक्षया लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघितले जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.