आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी कलाविश्वात कोरोनाचा शिरकाव:प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण, काही दिवस घरीच क्वारंटाइन राहिल्यानंतर आता लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उपचारांसाठी त्यांना वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाइन केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना सौम्य ताप येत होता. मात्र आता त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गुरुवारी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेते विनय येडेकर यांनी सांगितल्यानुसार,गेले आठ ते नऊ दिवस त्यांना ताप येत होता. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली.

विजय केंकेर यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. परफेक्ट मर्डर, महारथी, सर्किट हाऊस ही त्यांची रंगभूमीवरील गाजलेली नाटकं आहेत. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केला आहे. अलीकडच्या काळात ते भाई.. व्यक्ती की वल्ली आणि मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटांमध्ये दिसले.

काही दिवसांपूर्वीच विजय केंकरे यांची आई ललिता केंकरे यांचे निधन झाले होते. त्यानंतर ते घरीच होते.

बातम्या आणखी आहेत...