आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीना देशपांडे या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या.

आचार्य अत्रे यांच्या कन्या आणि प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीना देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती असे सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध कवी आणि लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

मीना सुधाकर देशपांडे यांची साहित्य संपदा:

  • आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
  • अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड 6-7-8)
  • पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)
  • मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित चरित्र )
  • मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)
  • ये तारुण्या ये (कथासंग्रह)
  • हुतात्मा (कादंबरी)
  • महासंग्राम ( कादंबरी)