आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘८ दोन ७५’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सन्मान:'चार आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी भारावून गेलोय, हा सन्मान माझ्यासाठी स्वप्नवत आहे' – अभिनेता शुभंकर तावडे

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभंकरला चार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत.

अभिनेता शुभंकर तावडे एक उत्तम अभिनेता आहे. हे त्याने आपल्या वेगवेगळ्या कलाकृतींनी सिध्द केले आहेच. पण आता त्याच्या सर्वोत्कृष्ट अभिनयावर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर उमटलीय. ‘८ दोन ७५’ या चित्रपटातल्या त्याच्या उत्तम अभिनयासाठी त्याला चार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत.

इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, ड्रुक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट​​​​​​ अभिनेता आणि बिरसामुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता अशा चार फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कारांनी त्याचा गौरव झाला आहे.

या यशाबद्दल अभिनेता शुभंकर तावडे म्हणतो , “आपला अभिनय देश-विदेशातल्या सिनेरसिकांनी पाहावा, ही सुप्त इच्छा प्रत्येक अभिनेत्याची असते. त्यामुळे देशात आणि परदेशातल्या 65 फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझी फिल्म झळकणे ही गोष्टच माझ्यासाठी भारावून जाणारी होती. त्यात अनेक ठिकाणी माझ्या अभिनयाचे कौतुक झाले, हे ऐकून मी आनंदित होतोच. पण त्याहुनही पुढे जात अभिनयासाठीचे सर्वोत्कृष्ट चार पुरस्कार प्राप्त करणे, हा तर दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. हे सगळं अगदी स्वप्नवत आहे.”

बातम्या आणखी आहेत...