आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार:अभिनेता पुष्कर जोगच्या आईविरोधोत गुन्हा दाखल, कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचा आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय आहे प्रकरण?

सध्या 'अदृश्य' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असलेला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोगची आई सुरेखा जोग कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. 'जोग एज्युकेशन ट्रस्ट'च्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षण विभागातील अधिकारी किसन दतोबा भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग तसेच गौतम शंकर शडगे, किशोर पवार, हेमंत सावळकर यांच्या विरोधात भादवी 420, 464, 465, 466, 468, 470, 471,201, आणि 120 ब 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?
'जोग एज्युकेशन'च्या 11 शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून स्व-मान्यता (बनावट) प्रमाणपत्र तयार करून कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सुरेखा जोग यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 11 बनावट शाळांकडून विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे.

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2022 या तीन वर्षांच्या कालावधी दरम्यान जोग एज्युकेशन ट्रस्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या 11 शाळांची खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून शाळांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई टाळण्यासाठी जोग एज्युकेशन ट्रस्टने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर केली आहेत. तसेच या अकरा शाळांच्या मुख्याध्यापकाद्वारे 25% मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रतिशुल्क मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांना सादर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींना सध्या अटक करण्यात आली नसून बंडगार्डन पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे

बातम्या आणखी आहेत...