आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग प्रोजेक्ट:सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र येतेय पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीसची फ्रेश जोडी, जाणून घ्या त्यांच्या नवीन मराठी चित्रपटाविषयी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडच्या प्रख्यात सिनेमॅटोग्राफरला मराठी चित्रपटाची भुरळ

2021 या वर्षात सिल्व्हर स्क्रिनवर पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीस ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अदृश्य' या मराठी चित्रपटात हे दोघे एकत्र दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शुटिंग डेहराडून येथे सुरू झाले आहे. बॉलिवूडचे प्रथितयश सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

अलीकडेच पुष्कर जोगने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन या चित्रपटाची घोषणा केली आहे. पुष्कर आणि मंजिरीसह सौरभ गोखले या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

कबीर लाल यांनी वेलकम बॅक, परदेस, ताल, हम आपके दिल में रहते है या व अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे तर अजय सिंग हे निर्माते लवली वर्ल्ड प्रॉडक्शन्स या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

या चित्रपटाविषयीची अधिक माहिती निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवली असून रिलीज डेटही जाहीर केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...