आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलेब ट्रेंड:सैफ अली खानपासून ते संजय दत्तपर्यंत, वयाच्या पन्नाशीत बाबा झाले हे बॉलिवूड स्टार्स

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे पन्नाशीत आल्यावर पुन्हा एकदा बाबा झाले आहेत.

अभिनेता सैफ अली खान लवकरच चौथ्यांदा बाबा होणार आहे. त्याची दुसरी पत्नी करीना कपूर खान वयाच्या 39 व्या वर्षी पुन्हा एकदा गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे. हे सैफ आणि करीनाचे दुसरे अपत्य असेल. सैफला पहिली पत्नी अमृता सिंगपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत तर करीनापासून सैफला तैमुर अली खान हा एक मुलगा आहे.

सैफने 16 ऑगस्ट 2020 रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या या टप्प्यावर वडील होणारा सैफ पहिला अभिनेता नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे पन्नाशीत आल्यावर पुन्हा एकदा बाबा झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत जे पन्नाशीत येऊन बाबा झाले..

संजय दत्त

संजय दत्त तीन मुलांचा बाबा आहे. पहिली पत्नी रिचा शर्मापासून संजयला एक मुलगी असून त्रिशाला दत्त हे तिचे नाव आहे. त्रिशाला आता 32 वर्षांची आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर संजयने रिया पिल्लईसोबत दुसरे लग्न केले होते. मात्र या लग्नापासून त्याला मुल झाले नाही. रियापासून विभक्त झाल्यानंतर 2008 मध्ये संजयने मान्यता दत्तसोबत लग्न केले. 2010 मध्ये मान्यताने शाहरान आणि इकरा या जुळ्या मुलांना जन्म दिला. तेव्हा संजय 51 वर्षांचा होता. आता शाहरान आणि इकरा 10 वर्षांचे झाले असून संजय 61 वर्षांचा झाला आहे.

शाहरुख खान

शाहरुख खानने 1991 मध्ये गौरी छिब्बरसोबत लग्न केले होते. 1997 मध्ये त्यांचा मुलगा आर्यनचा जन्म झाला. तर 2000 मध्ये गौरीने मुलगी सुहानाला जन्म दिला होता. सुहानाच्या जन्माच्या 13 वर्षांनी म्हणजे 2013 मध्ये त्यांच्या तिस-या मुलाचा जन्म झाला. शाहरुख आणि गौरीनेही सरोगसीच्या मदतीने तिसरा मुलगा अबरामला जन्म दिला. अबरामच्या जन्माच्या वेळी शाहरुखचे वय 48 वर्ष होते.

आमिर खान

आमिर खानची दोन लग्न झाली आहेत. पहिले लग्न रीना दत्ता (1986) सोबत झाले. पहिल्या लग्नापासून आमिरला मुलगा जुनैद (1993) आणि मुलगी इरा (1997) आहेत. रीनासोबत 2002 मध्ये आमिरने घटस्फोट घेतला आणि 2005 मध्ये किरण रावसोबत दुसरे लग्न केले. आमिर आणि किरण राव सरोगसीच्या मदतीने पालक झाले. 2011 मध्ये त्यांचा मुलगा आझाद राव खानचा जन्म झाला. आमिर खान जेव्हा तिसऱ्यांदा बाबा झाला तेव्हा त्याचे वय 48 होते.

अक्षय कुमार

अक्षय कुमारने 2001 मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. त्यानंतर वर्षभरात त्यांच्या घरी पाळणा हलला आणि 2002 मध्ये त्यांचा मुलगा आरवचा जन्म झाला. आरवच्या जन्माच्या दहा वर्षांनी अक्षय-ट्विंकल पुन्हा एकदा पालक झाले. 2012 मध्ये त्यांची मुलगी निताराचा जन्म झाला. निताराच्या जन्माच्या वेळी अक्षयचे वय 45 वर्ष होते.

सोहेल खान

सोहेलने 1998 मध्ये सीमा खानसोबत लग्न केले होते. 2000 मध्ये त्यांचा मुलगा निर्वाणचा जन्म झाला. मात्र सोहेल आणि सीमा यांना आणखी एक मुल हवे होते. त्यामुळे त्यांनी आयव्हीएफची मदत घेतली आणि 2011 मध्ये त्यांचा दुसरा मुलगा योहानचा जन्म झाला. त्यावेळी सोहेल 42 वर्षांचा होता.

बातम्या आणखी आहेत...