आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेत रघू ही भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मुळचा नागपूरचा. वडील शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. संचितने सायकॉलॉजीमध्ये एम ए केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली.
नागपूर ते मुंबई प्रवास
संचितचा नागपूर ते मुंबई प्रवास फारच रंजक आहे. संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा. दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्याने नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला.
शिक्षकाची नोकरी
तत्पूर्वी त्याने नागपूरमधील के.आर. पांडव कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर डीएड केले. त्यानंतर त्याला आदर्श विद्यामंदिर, गांधीबाग येथे शिक्षकाची नोकरीदेखील मिळाली. दरम्यान त्याने रंगभूमीवर सापत्नेकरांचं मुल, इश्क के गळबळ जाले, पाणीपुरी, डॉकटर्स डेलिमा, सितारे मून वर, अंधेरी नगरी चौपट राजा ही नाटकं आपल्या अभिनयाचे गाजवली.
2017 मध्ये मुंबईत आल्यानंतर संचितने पृथ्वी थिएटरमध्ये बरेच प्ले सादर केले. बरेच वर्कशॉप्सही तो घेत होतो. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं. नोकरी करता करता हे सर्व चालू होतं.
नोकरी सोडण्याचा निर्णय
अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता. खिसे भरत होते मात्र मन भरत नव्हतं. त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्याने पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनीही साथ दिली.
'प्रेमाचा गेम सेम टू सेम' मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता संचित 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकेत रघूच्या भूमिकेत दिसत आहे.‘रघू फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो’ हे ब्रीदवाक्य घेऊन मनमौजी जगणारा. स्वातीवर त्याचं जीवापाड प्रेम आहे. स्वाती रघूच्या प्रेमाचा स्वीकार करणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.