आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलर्स मराठीवरील 'सोन्याची पावलं' मालिकेत गौरी – गणपतीचे आणि 'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात होणार आहे.
'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये ढालेपाटीलांच्या घरामध्ये बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे.
रणजीत घरच्या बाप्पाची स्थापना करणार आहे.
घरच्यांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. ढालेपाटीलांच्या घरात थाटामाटात आगमन तर होणार आहे पण या प्रसंगी सगळ्यांना संजूची कमतरता नक्कीच भासणार आहे.
संजूवर आता घराची आणि कामाची अशी दुहेरी जबादारी आहे, जी ती उत्तमरीत्या पार पाडत आहे. अनेक मुली, लग्न झालेल्या स्त्रिया त्यांची नोकरी सांभाळून घराच्या जबाबदार्या अगदी चोखपणे पार पडताना आपल्याला दिसतात मला त्या सगळ्या स्त्रिया, मुलींचा अभिमान आणि कौतुक आहे. आणि मी नशीबवान आहे मला अशी भूमिका करण्याची संधी मिळाली असं ती म्हणतेय.
यावेळेसचा गणेशोत्सव संजूसाठी थोडा वेगळा असणार आहे. कारण ती बाप्पाची आरती ऑनलाइन करणार आहे. पोलिसांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन होते. पण त्यांना गणरायाच्या आगमनासाठी सज्ज राहावं लागतं आणि सगळे सुखरूप आपल्या घरी पोहचावेत ही त्यांची जबाबदारी असते आणि आता हीच जबाबदारी संजीवनी मालिकेत पार पाडताना दिसणार आहे.
'सोन्याची पावलं' मालिकेमध्ये गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. पण भाग्यश्री – दुष्यंतवर खूप मोठं संकट ओढवणार आहे. ही बातमी घरात कळताच एकीकडे उमा देवाला साकड घालणार आहे. तर दुसरीकडे भाग्यश्रीला देवीआई दर्शन देणार आहे.
त्या संकटावर ते दोघे कशी मात करणार. पुढे काय होणार? हे 12सप्टेंबरच्या एका तासाच्या विशेष भागामध्ये प्रेक्षकांना बघता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.