आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील ‘अबोली’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. सोहमच्या खुनाचा आरोप अबोलीवर आहे. अबोलीने खरंच हा खून केलाय की तिला विनाकारण यात अडकवलं जातंय याची उकल लवकरच मालिकेच्या पुढील भागांमधून होईणार आहे. पण सध्या खुनाचं हे नाट्य कोर्टापर्यंत येऊन पोहोचलं आहे. अबोलीच्या बाजून केस लढणार आहे नामांकित वकील अजिंक्य राजाध्यक्ष. प्रसिद्ध अभिनेता गौरव घाटणेकर अजिंक्य राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
'अबोली' मालिकेतील ही वकिलाची भूमिका साकारण्यासाठी गौरव अतिशय उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना गौरव म्हणाला, ‘मी याआधी बऱ्याचदा वकिलाची भूमिका साकारली आहे. मला वकिलाची भूमिका साकारायला अतिशय आवडतं. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वकील साकारताना अतिशय ताकदीचे संवाद सादर करता येतात. एक अभिनेता म्हणून मला हे अतिशय आव्हानात्मक वाटतं. अजिंक्य राजाध्यक्ष हा तत्वनिष्ठ वकील आहे. अबोली निर्दोष आहे ही गोष्ट जेव्हा त्याला समजते तेव्हा तिला न्याय मिळून देण्याच्या एकमेव हेतूने तो ही केस हाती घेतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अबोलीच्या विरोधात अजिंक्यची सावत्र बहीण विजया राजाध्यक्ष केस लढत आहे. त्यामुळे अबोलीला न्याय मिळवून देण्यासाठी गौरव जीवापाड मेहनत घेणार आहे," अशी भावना गौरव घाटणेकरने व्यक्त केली.
तेव्हा अबोली मालिकेतील न्यायाची ही सर्वात मोठी लढाई पाहायला विसरु नका सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.