आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिझर:गौतमी पाटीलच्या पहिल्या चित्रपटाचा टिझर रिलीज, 'घुंगरु'त साकारली लावणी कलावंताची भूमिका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिची प्रमुख भूमिका असलेल्या 'घुंगरू' या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. स्वतः गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा टिझर शेअर केला आहे. टिझर शेअर करत गौतमीने त्याला कॅप्शन दिले, 'माझ्या चित्रपटाचा टिझर.'

गौतमीच्या या पहिल्या वहिल्या चित्रपटाची निर्मिती चिंतामणी सिने क्रिएशन्स प्रस्तुत बाबा गायकवाड आणि अजित केंद्रे यांनी केली आहे. तर संदीप डांगे यांनी दिग्दर्शन केले आहे. या टिझरमधून चित्रपटाची कथा ही लावणी कलावंताच्या जीवनावर आधारित असल्याचे दिसून येते. यात गौतमी पाटीलचा डान्स पाहायला मिळतोय, तसेच हाणामारीचे दृश्यही यात दिसत आहेत. बाबा गायकवाड यांनीच या चित्रपटात नायकाची भूमिका साकारल्याचे टिझरवरुन दिसून येते.

‘घुंगरू’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच गौतमी पाटील या चित्रपटात एका लावणी कलावंताची भूमिका साकारत आहे. तिच्या आयुष्यात येणाऱ्या अघटित घटनांमुळे नायकाच्या ती प्रेमात पडते. यात राजकारण, थरारदृश्य देखील पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असला तरी ट्रेलर व चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पहिल्या चित्रपटाविषयी काय म्हणाली गौतमी?
काही दिवसांपू्र्वी दिलेल्या एका मुलाखतीत गौतमी आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाविषयी भरभरुन बोलली होती. गौतमी म्हणाली, "घुंगरू हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रेक्षक करत असतात. प्रेक्षकांमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. माझ्यावर जसे प्रेम केले, तसेच घुंगरू चित्रपटावरही करावे. हा चित्रपट आवर्जन पाहा. हा माझा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटात अभिनय करताना अनेक अनुभव आले."

परदेशातही झाले चित्रपटाचे चित्रीकरण
मध्यंतरी गौतमीच्या या चित्रपटाचे शूटिंग थेट परदेशात झाल्याचे वृत्त आले होते. थायलंडमध्ये हे चित्रीकरण पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. बाबा गायकवाड यांनी या चित्रपटाचे लेखनही केले आहे.