आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतमी पाटीलला मिळाले चित्रपटाचे तिकीट:आता झळकणार थेट सिल्व्हर स्क्रीनवर, 'हा' आहे चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लावणी डान्सर म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील हिची गणना आता अभिनेत्रींमध्ये होणार आहे. कारण आता ती थेट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लवकरच तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एका व्हायरल व्हिडिओमुळे गौतमीवर टीका झाली. त्याबाबत तिने स्पष्टीकरणही दिले. पाहता पाहता वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही गौतमी सोशल मीडिया स्टार म्हणून प्रसिद्धीझोतात आली. आणि आता याच प्रसिद्धीने तिला चित्रपट मिळवून दिला आहे.

हा आहे चित्रपट
'घुंगरु' असे गौतमीच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे नाव आहे. गौतमीच्या या चित्रपटाचे शूटिंग थेट परदेशात झाल्याचे वृत्त आहे. थायलंडमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले आहे. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे. तेच या चित्रपटात गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे म्हटले जाते आहे. बाबा गायकवाड यांनी या चित्रपटाचे लेखनही केल्याचे समजते. यापूर्वी एका लोकप्रिय मराठी मालिकेत बाबा गायकवाड झळकले होते.

गौतमी पाटील आहे तरी कोण?
गौतमी पाटीलवर टीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे मात्र तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्य क्षेत्राकडे वळल्याचे ती सांगते. गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केले.

चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले होते. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवीचे शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली. आठवीला असताना गौतमीने वडिलांना पहिल्यांदा पाहिले होते.

गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी पडली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली होती. सुरुवातील ती बॅकडान्सर म्हणून काम करायची. 'गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो'च्या माध्यमातून मी लावणी करीत असते. हा पूर्णवेळ लावणीचा कार्यक्रम नाही. येथे डिजेच्या गाण्यावर नृत्य केले जाते. गौतमीच्या डान्सचे कार्यक्रम आता राज्यभर होतात. तिचे म्यझिक अल्बमही लाँच झाले आहेत. आता मोठ्या पडद्यावर गौतमी काय कमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...