आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत अभिनेता रितेश देशमुख:देशमुखांची सून जिनिलियाचे 'वेड' या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, पती रितेश देशमुखचे दिग्दर्शन; सासूबाईंनी दिला मुहूर्ताचा क्लॅप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 ऑगस्ट 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबई फिल्म कंपनीने आज सहाव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. 'वेड' असे या चित्रपटाचे नाव असून तब्बल दहा वर्षांनंतर जिनिलिया मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. जिनिलियाने चित्रपटाच्या मुहूर्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या सासूबाई वैशाली देशमुख यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला.

रितेशने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ''वर्ष 2001. साधारण 20 वर्षापुर्वीची गोष्ट. मी कॅमे-यासमोर उभा राहिलो होतो. तेव्हा मनात भिती, उत्सुकता आणि जिद्द होती. पण ते स्वप्न होतं. काहींना वाटलं की हा वेडेपणा आहे. नंतर आपण सगळ्यांनी अनेक आशीर्वाद आणि प्रेम देऊन हे #वेड जिंवत ठेवलं.वर्ष 2021. मी कॅमे-याच्या मागे जाण्याचा वेडेपणा करतोय. मनात तशीच भिती, उत्सुकता आणि जिद्द आहे.पुन्हा आपल्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असु द्या.परत एक स्वप्न पाहतोय.परत नवं #वेड मांडतोय."

यापूर्वी जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. 12 ऑगस्ट 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...