आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी कार्यक्रमाच्या सेटवर गोंधळ:‘सूर नवा ध्यास नवा’च्या सेटवर आमदार विजय सरदेसाई यांचा गोंधळ, शूटिंग बंद करण्याची मागणी; अवधुत गुप्तेंनी केली मध्यस्थी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या, नेमके प्रकरण आहे तरी काय?

कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात ब्रेक दे चेन अंतर्गत सर्व प्रकाराच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हिंदी आणि मराठी वाहिन्यांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण सुरु केले आहे. अनेक मराठी मालिकांचे गोव्यात चित्रीकरण सुरु आहे. कलर्स वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या सांगितिक कार्यक्रमाचे चित्रीकरण गोव्यातील मडगांव येथील रविंद्र भवन येथे सुरु आहे. मात्र या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान नुकताच गोंधळ उडालेला बघायला मिळाला.

  • नेमके काय झाले?

‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचे देखील मडगांव येथे चित्रीकरण सुरु असताना गोव्यातील फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी चित्रीकरणाला विरोध दर्शवला आहे. चित्रीकरण सुरु असतानाच सरदेसाई तेथे आले आणि त्यांनी चित्रीकरणाला विरोध दर्शवला. चित्रीकरणामुळे त्या भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या घटनेचा व्हिडिओ आमदार सरदेसाई यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या असून सर्व नियमांचे पालन करुन चित्रीकरण सुरु असल्याचा दावा केला आहे. दरम्यान या वादामध्ये गायक अवधूत गुप्ते यांनी मध्यस्ती केली. मात्र आता यापुढे कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरु राहणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...