आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटांची 'दुबई'वारी:'गल्फ सिने फेस्ट 2021' च्या लोगोचे महेश कोठारेंच्या हस्ते अनावरण, दुबईमध्ये रंगणार सोहळा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुबईमध्ये 20 ते 23 जानेवारी दरम्यान मराठी चित्रपटांचा प्रीमियर सोहळा रंगणार आहे.

एखाद्या भयावह स्वप्नाप्रमाणे वाटावे असे 2020 वर्ष संपता-संपता मराठी सिनेसृष्टी आणि रसिकांसाठी एक गोड बातमी घेऊन आले आहे. कोरोना आणि लॅाकडाऊनच्या वातावरणामुळे आलेली मरगळ झटकून नव्या जोमाने आणि उमेदीने पुन्हा गगनभरारी घेत मराठीची पताका सातासमुद्रापार फडकवण्यासाठी मराठी सिनेसृष्टी सज्ज झाली आहे. मराठी सिनेसृष्टीत जणू नवचैतन्य आणि उत्साह संचारल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. नवीन वर्षाची सुरुवात काहीशा नव्या शैलीत व्हावी या उद्देशाने दुबईमध्ये 'गल्फ सिने फेस्ट 2021'चे आयोजन करण्यात आले आहे. नुकताच या सोहळ्याच्या लोगोचे अनावरण करण्यात आले आहे.

20 ते 23 जानेवारी 2021 या दरम्यान दुबईमध्ये'गल्फ सिने फेस्ट 2021'चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारका सहभागी होणार आहेत. देश-विदेशातील मान्यवर पाहुणे या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. मनोरंजनाची मेजवानी असलेल्या या बहुचर्चित आणि अनोख्या सिनेसोहळ्याचा लोगो ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे. याप्रसंगी सोहळ्याचे आयोजक सचिन कटारनवरे हेही उपस्थित होते.

'गल्फ सिने फेस्ट 2021' हे मराठी सिनेसृष्टीसाठी सकारात्मक पाऊल असून, 2021 हे वर्ष मराठी सिनेमांसाठी उत्साहवर्धक ठरेल, अशी आशा कोठारे यांनी व्यक्त करत 'गल्फ सिने फेस्ट 2021'च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

'5 जी इंटरनॅशनल'च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसाच्या या रंजक सोहळ्यात चित्रपटांच्या मेजवानीसह रंजक कार्यक्रमांची रेलचेल प्रेक्षकांसाठी असणार आहे. खेरीज काही मराठी सिनेमांच्या ट्रेलर्स, प्रोमोज आणि गाण्यांची झलकही सिनेचाहत्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे 'गल्फ सिने फेस्ट 2021' च्या निमित्ताने रंगणारा मनोरंजनाचा हा धमाकेदार सोहळा रसिकांसाठी एक वेगळी पर्वणी असणार हे नक्की.

बातम्या आणखी आहेत...