आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली समीप लग्नघटिका!:अक्षयाच्या हातावर सजली मेंदी, हार्दिक जोशीला लागली हळद; लग्नघरातील व्हिडिओ आले समोर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोघे आता ख-या आयुष्यात साता जन्माच्या गाठीत अडकणार आहेत. सध्या हार्दिक आणि अक्षया यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. ग्रहमखपासून अक्षयाच्या घरी लग्नविधींना सुरूवात झाली. आता अक्षय आणि हार्दिकने त्यांच्या लग्नविधींचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हार्दिकला लागली हळद
नुकतीच हार्दिकला हळद लागली. हार्दिकच्या हळदीच्या कार्यक्रमाला त्याची इंडस्ट्रीतील कलाकार मंडळीही उपस्थित होती. हार्दिकचा मित्र आणि अभिनेता अमोल नाईकने हार्दिकच्या हळदी कार्यक्रमाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

हार्दिकला आता अक्षयाच्या नावाची हळद लागली आहे. हार्दिकने त्याच्या हळदीसाठी पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला आहे. तसेच त्याने मुंडावळ्या बांधल्या आहेत.

हळदी कार्यक्रमासाठी हार्दिकच्या घरी खास डेकोरेशन करण्यात आले आहे. शिवाय अक्षयानेदेखील तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हार्दिकच्या हळदीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अक्षयाच्या हातावर सजली मेंदी
दुसरीकडे अक्षयाच्या हातावर हार्दिकच्या नावाची मेंदी सजली आहे. मेंदी सोहळ्यासाठी अक्षयाने खास डिझायनर आउटफिट परिधान केला होता. अक्षयाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर मेंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

उद्या म्हणजे 1 डिसेंबर रोजी पुण्यात अक्षया आणि हार्दिकचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...