आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकरची जोडी येणार भेटीला, मालिकेविषयी दोघेही म्हणतात...

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवी मालिका 'फुलाला सुगंध मातीचा' 2 सप्टेंबरपासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाहवर 2 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना हर्षद अतकरी म्हणाला, ‘या मालिकेत मी शुभम ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. केशव या पात्राच्या पूर्णपणे वेगळं पात्र मी 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत साकारतो आहे. अतिशय शांत आणि मवाळ असं हे पात्र आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मी खूपच उत्सुक आहे.’

समृद्धी केळकरला ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका म्हणजे नवं आव्हान वाटतं. या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना समृद्धी म्हणाली, ‘या मालिकेत मी साकारत असलेली व्यक्तिरेखा ही प्रचंड आत्मविश्वासू, खंबीर आणि जिद्दी मुलीची आहे. याआधीच्या मालिकेत मी खूपच सहनशील आणि गरीब मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. फुलाला सुगंध मातीचा मालिकेतला माझा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'