आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनोरंजन:मला मालिकेतून काढले नाही, तर मीच मालिका सोडली; अलका कुबल यांनी आरोप लावणे चुकीचे : प्राजक्ता गायकवाड

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्याशी गैरवर्तणूक होत असेल तर मी आवाज उठवणारच, प्राजक्ताचे प्रत्युत्तर

मी ‘आई माझी काळुबाई’ मालिका सोडली. मला कोणीही काढलेले नाही. मालिकांचे कलाकारच जर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतील तर येथील वातावरण महिला कलाकारांसाठी सुरक्षित कसे असेल? त्यात अलका कुबल यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीने असे आरोप लावणे चुकीचे आहे. त्यांची भूमिका योग्य नाही. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान असून, त्यांनी आरोप करणे थांबवावे. माझ्याशी गैरवर्तणूक होत असेल तर मी आवाज उठवणारच, अशा शब्दांत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर दिले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यात आयोजिलेल्या वार्तालापात तिने आपली भूमिका मांडली. प्राजक्ता हिने एका वाहिनीवरील ‘आई माझी काळुबाई’ मालिका नुकतीच सोडली. तिच्या मालिका सोडण्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. प्राजक्ता सेटवर उशिरा यायची, तिच्यामुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागायचे, तिच्या कामात आईचा हस्तक्षेप असायचा, त्यामुळे तिला मालिकेतून काढून टाकल्याचे मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांनी माध्यमांत दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. याचे खंडन करत प्राजक्ता यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्राजक्ता म्हणाली, माझ्या कामाला महाराष्ट्रातील जनतेने नेहमी कौतुकाची पावती दिली आहे. मी आजपर्यंतच्या सर्व भूमिका प्रामाणिकपणे केल्या आहेत. म्हणूनच माझ्या कामावर असे आरोप होत असल्याची मला खंत वाटते, असेही प्राजक्ता हिने या वेळी बोलताना सांगितले.