आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इगतपुरीतील रेव्ह पार्टी:हीना पांचालसह 20 संशयितांना न्यायालयीन काेठडी, मध्यवर्ती कारागृहात झाली रवानगी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हीना पांचालसह 20 संशयितांना पाेलिस काेठडी संपताच न्यायालयीन काेठडी

इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला बंगल्यात झालेल्या रेव्ह पार्टीमधील अटक करण्यात आलेली अभिनेत्री हीना पांचालसह 20 संशयितांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायदाअंतर्गत दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर संशयितांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बुधवारी (7 जुलै) हीनासह सर्व संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

हीना पांचालसह तीन अभिनेत्रींना कोर्टात हजर करताना पोलिस.
हीना पांचालसह तीन अभिनेत्रींना कोर्टात हजर करताना पोलिस.

इगतपुरी रेव्ह पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या अनुषंगाने पथकाने सर्व चौकशी केली. एका संशयिताने पार्टीत अमली पदार्थ घेतल्याची कबुली दिली आहे.

सरकारपक्षाकडून विषेश सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांनी युक्तिवाद करत पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. एक संशयिताने प्राथमिक कबुली दिली. पोलिसांच्या कारवाईनंतर हे अमली पदार्थ बंगल्यातील असलेल्या जलतरण तलावात मध्ये फेकल्याचे सांगण्यात आले. इतरत्रही त्यांचा शोध घेणे बाकी असल्याचे सांगत संशयितांची पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी केली. ती फेटाळून न्यायालयाने सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हीनासह इतरांची स्थानिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यात हीनाने मुंबई येथील काही ड्रग्स पेडलर्सची नावे सांगितल्याचे तसेच इतरही महत्वाची माहिती प्राप्त झाली असल्याचे व त्यातून मुंबईमधील बाॅलिवूडशी संबधीत आणखी काही नावे निष्पन्न झाल्याची तपासातील प्रगतीही न्यायालयात सांगण्यात आली.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह पथकाने इगतपुरी येथील स्काय ताज व्हिलावर छापा टाकून अभिनेत्री हिना, सह परदेशी महिला, हिंदी आणि तेलगू चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री, कोरिओग्राफर, यांना अटक केली होती. त्यात परदेशी नागरिक असलेल्या महिलेचाही समावेश असल्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले हाेते.

तरण तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविणार
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितल्यानुसार, पार्टीत अमली पदार्थांचा वापर झाल्याची कबुली संशयितांनी दिली. पाेलिस येताच ते बंगल्यातील जलतरण तलावात फेकण्यात आले. त्यामुळे पोलिस आणि महसूल यंत्रणाकडून तलावाती पाण्याचे नमुने आता तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...