आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इंडियन आयडॉल आता मराठीत:सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच घेऊन येते आहे 'इंडियन आयडॉल - मराठी', महाराष्ट्रातला आवाज पोहोचणार घराघरांत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेक्षकांना 'इंडियन आयडॉल - मराठी' लवकरच पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सोनी मराठी वाहिनी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच 'इंडियन आयडॉल - मराठी' घेऊन येते आहे. 'इंडियन आयडॉल - मराठी'मुळे स्पर्धकांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजनही होईल.

'इंडियन आयडॉल'ची आत्तापर्यंत अनेक पर्व झाली आहेत, ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यातून देशाला अनेक कलाकारही मिळाले आहेत. आता 'इंडियन आयडॉल - मराठी' या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना 'इंडियन आयडॉल - मराठी' लवकरच पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...