आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'डॉक्टर डॉन' मालिकेचा इंट्रेस्टिंग ट्रॅक:अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली, अक्का आणि मोनिकाच्या भांडणांमध्ये देवा काय करणार!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही डॉली दुसरी तिसरी कोणी नसून एक म्हैस आहे.

छोट्या पडद्यावरील डॉक्टर डॉन ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली आहे. देवा भाईची हटके स्टाईल, त्याची भन्नाट गँग, डॉलीबाई आणि त्यांची जुगलबंदी आणि मुलीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्या कॉलेजमध्ये देवा भाईने केलेला दंगा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील देवा आणि डॉक्टर मोनिका ही पात्रं तर त्यांच्या मनात घरकरून बसली आहेत. सोशल मीडियाद्वारे देखील या कलाकारांवर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.

सध्या मालिकेतील देवा आणि डॉ मोनिका यांचा लव्हट्रॅक चांगलाच पसंत केला जातोय हे समजेल. आता दोन व्यक्तिंमधलं प्रेम म्हंटलं की त्यात उतार चढाव आलेच, रुसवे फुगवेही आले शिवाय आपल्याच लोकांची नाराजी किंवा त्यांचे हेवेदावेही आलेच. डॉक्टर डॉन मध्ये सध्या याच प्रेमाची परिक्षा पाहिली जातेय. देवाच्या प्रेमाला अक्काचा साफ विरोध आहे हे प्रेक्षकांनी पाहिलंच आहे. पण अक्का आता देवाच्या आयुष्यात अजून एक डॉली घेऊन येणार आहे आणि ही डॉली दुसरी तिसरी कोणी नसून एक म्हैस आहे जी अक्का डॉलीच्या घरासमोर बांधते.

आता डॉलीबाई या नवीन डॉलीला बघून काय प्रतिक्रिया देणार आणि देवा या नवीन डॉलीचा स्वीकार करणार का? अक्का आणि मोनिकाच्या भांडणांमध्ये देवाची काय अवस्था होणार? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.