आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपली अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री ईशा केसकर आणि चॉकलेट बॉय ऋषी सक्सेना गेल्या चार ते पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आज ऋषीचा वाढदिवस असून यानिमित्ताने ईशाने खास अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईशाने तिच्या इन्स्टाग्रामवर ऋषीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
ऋषीच्या वाढदिवसानिमित्त ते दोघेही फिरायला गेले आहेत. एकमेकांसोबत निवांत वेळ घालवताना व्हिडिओ ईशाने शेअर केला आहे. यात ते दोघेही रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना ईशा म्हणाली, "ऋषी सक्सेना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू खरंच बेस्ट आहेस, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे."
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावरुन झाली दोघांची लव्ह स्टोरी
'जय मल्हार' या मालिकेतील 'बानू' या भूमिकेतून ईशा घराघरांत पोहोचली. तर ऋषीने काहे दिया पसदेस या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. 'चला हवा येऊ द्या'च्या या कार्यक्रमाच्या सेटवर या दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिले. पाहताक्षणी ऋषी अतिशय शांत असल्याचे ईशाच्या लक्षात आले. त्यावेळी दोघांत फारसे बोलणे झाले नव्हते.
नंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने तयारीच्या वेळी पहिल्यांदाच त्यांच्यात बोलणे झाले. पुढे कॉफीसाठीच्या निमित्ताने दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. ईशानेच सर्वप्रथम ऋषीला कॉफीसाठी विचारले होते. या भेटीतच त्याचा निरागसपणा तिच्या मनाला भावला.
ईशाने आपल्या मनातल्या भावना ऋषीकडे व्यक्त केल्या. पण आपल्यात फारशी ओळख नसल्यामुळे नात्याच्या या नव्या वळणाला ऋषी तयार नव्हता. पुढे दोघे वर्षभर चांगले मित्र राहिले. पुढे जाऊन ईशा आपल्याला आवडू लागल्याची कबुली ऋषीने दिली. अशाप्रकारे त्यांच्या प्रेमाला सुरु झाली.
ईशा आणि ऋषीचे करिअर
ऋषीचा जन्म मुंबईत झाला. त्याचे शिक्षणही मुंबईतच झाले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ऋषीने मॉडेलिंग केले होते. 'काहे दिया परदेस' ही त्याची पहिली मालिका. या मालिकेत शिव नावाच्या एका उत्तर भारतीय मुलाची भूमिका त्याने साकारली होती. या मालिकेतून तो लोकप्रिय झाला. मालिकेनंतर ऋषी वेब सिरीजकडे वळताना दिसला. त्याची प्रेम, रोमान्स आणि कॉमेडीवर आधारित असलेली वेब सिरीज 'गुडबॉय' हंगामा, एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली होती. ‘द राईट वन’ ही त्याची शॉर्टफिल्मही रिलीज झाली आहे.
ईशाने ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘वुई आर ऑन’, ‘गर्लफ्रेंड’, 'होऊन जाऊ द्या' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामध्ये ही तिने काम केले आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तिने साकारलेली शनाया ही भूमिका खूप गाजली होती. अलीकडेच तिचा सरला एक कोटी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.