आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे:'या' कारणामुळे ईशा केसकरने जपानला जायची संधी सोडली होती, अभिनेता ऋषी सक्सेनासोबत आहे रिलेशनशिपमध्ये

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईशा केसकर हिचा आज वाढदिवस आहे.

छोट्या पडद्यावरील ‘जय मल्हार’ या मालिकेतील बानूच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री ईशा केसकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 29 वर्षे पूर्ण केली आहेत. 11 नोव्हेंबर 1991 मध्ये पुण्यातील एका मराठी कुटुंबात ईशाचा जन्म झाला. ईशा ही मूळची वैराग ची (बार्शी) आहे. नाट्य, एकांकिका आणि चित्रपटांमधून तिने भूमिका साकारल्या आहेत. माझ्या नव-याची बायको या मालिकेतील शनाया या भूमिकेचे खूप कौतुक झाले. पण खासगी कारणामुळे ईशाने ही भूमिका अर्ध्यावर सोडली.

अकाउंटंट म्हणून काम करणारे बाबा तर एका कंपनीत काम करणारी आई अशी ईशाच्या कटुंबाची पार्श्वभूमी आहे. सामान्य कुटुंबातून पुढे आलेली ईशाने स्वबळावर अभिनयात यश मिळवले आहे.

अशी मिळाली होती ईशाला पहिली मालिका
सिम्बॉयसिस कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करणा-या ईशाला जपानी भाषा शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. एके दिवशी ‘कोठारे प्रॉडक्शन’ची ऑडिशन आहे असा निरोप आला. त्यावेळी ईशाला जपानलाही जायची संधी आली होती. हे की ते असे निवडायची वेळ ईशावर आली. आई-बाबांनी शेवटची संधी घ्यायला हरकत नाही, असे सूचवले. आणि ईशाने मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला.

असा आहे प्रवास
पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजात पहिल्या वर्षात पदार्पण करताच ईशाने पुरुषोत्तम करंडक, आयएनटी, सवाई असे महोत्सव गाजवले. कला-नाट्य क्षेत्रात सहभागासाठी ती प्रयत्न करू लागली. सुरुवातीला एकांकिका, लघुपट मग व्यावसायिक नाटक असे अनुभव घेत ती ‘जय मल्हार’ मालिकेपर्यंत येऊन ठेपली.

बाबाच माझी प्रेरणा
जय मल्हार मालिकेच्या ऑडिशनला जाताना बाबांनी एक प्रयत्न कर. आपणास हवे ते क्षेत्र आपली वाट पहात असतेच. अशी प्रेरणा दिली होती, असे ईशाने सांगितले होते.

ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशिपमध्ये
काहे दिया परदेस या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता ऋषी सक्सेनासोबत ईशा रिलेशनशिपमध्ये आहे. ईशा आणि ऋषीची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली असल्याचे म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...