आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्ट मॅरिड:'इश्क वाला लव्ह' फेम अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत, प्रसिद्ध विनोदवीरासोबत बांधली लग्नगाठ

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रही लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

आदिनाथ कोठारेसह 'इश्क वाला लव्ह' या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रही लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लोकप्रिय विनोदी कलाकार बिस्वा कल्याण रथसोबत सुलग्नाने सप्तपदी घेतल्या.

नुकताच सुलग्नाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नातील फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. ‘आम्ही लग्न केले आहे’ असे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे.

तर बिस्वा कल्याण रथ यानेही लग्नातील फोटो शेअर केले आहेत. 'बिस्वा मॅरिड आदमी,' असे मजेशीर कॅप्शन त्याने लग्नाच्या फोटोला दिले आहे.

सुलग्नाने मराठीसोबतच ‘मर्डर 2’ या हिंदी चित्रपटातदेखील भूमिका साकारली होती. त्याचबरोबर तिने अनेक मालिकांमध्ये ही काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...