आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मन उडू उडू झालं'च्या निमित्ताने...:मंदार सरांसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य - हृता दुर्गुळे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदार देवस्थळी सोबत पुन्हा एकदा काम करण्याच्या अनुभवाबद्दल हृताने सांगितले.

'मन उडू उडू झालं' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. इंद्रा आणि दिपूच्या लव्हस्टोरीमध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतले आहेत. मालिकेला प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे कलाकार देखील खूप खुश आहेत. हृताची मंदार देवस्थळी सोबत ही दुसरी मालिका असून या मालिकेला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे त्यामुळे हृताने आनंद व्यक्त केला.

मंदार देवस्थळी सोबत पुन्हा एकदा काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना हृता म्हणाली, "मी खूप भाग्यवान आहे की मला पुन्हा एकदा मंदार देवस्थळी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मंदार सरांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. ते प्रत्येक सीनचा एक वेगळा पैलू काढून समजावून सांगतात. एखादा सीन वाचल्यावर तो सीन कसा करायचा हा प्रश्न पडतो पण जेव्हा सर तो सीन समजावतात तेव्हा त्यातील पैलू देखील सांगतात. त्यामुळे मला रोमँटिक सीन करणं सोपं जातं. तसंच प्रेमकथा उत्तमरित्या छोट्या पडद्यावर दाखवणं हा मंदार सरांचा हातखंडा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही मालिकेचं कथानक अधिक उत्तमरित्या सादर करू शकतो."

बातम्या आणखी आहेत...