आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिवर्ल्ड अपडेट:'बायको अशी हव्वी'मध्ये जान्हवीने घेतला आयुष्य बदलून टाकणारा निर्णय, आता जान्हवी-विभासचं नातं घेणार नवं वळण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विभास आणि जान्हवीचं नातं आता कुठे बदलू लागलं आहे.

'बायको अशी हव्वी' मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी जान्हवीने आयुष्य बदलून टाकणारा निर्णय घेतला. विभासला कडक शब्दांत काही गोष्ट सांगितल्या आणि त्याला शब्द देखील दिला की, मी राजेशिर्के घराण्याची सून आहे त्यामुळे हे घर सोडून जाणार नाही, पण इथल्या लोकांची विचारसारणी नक्कीच बदलेन. आणि आता हळूहळू तो बदल होताना दिसू लागला आहे. हा

शब्द पाळत असताना जान्हवीच्या आयुष्यात खूप मोठी संकट आणि आव्हानं देखील येत आहेत पण, नेहेमीप्रमाणे ती त्यांचा मोठ्या धीराने सामना करते आहे. तिच्यासमोर येणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरं देखील शोधते आहे आणि त्यातून मार्ग काढते आहे. त्यामध्ये विभासच्या तब्येतची देखील काळजी घेऊन त्याला धीर देते आहे, त्याच्या मागे ती खंबीरपणे उभी आहे. घरची सून म्हणून, विभासची बायको म्हणूनं येणार्‍या परिस्थितीशी लढते आहे. आणि हे करत असतानाच विभास आणि जान्हवीचं नातं आता कुठे बदलू लागलं आहे.

या उभ्या ठाकलेल्या परिस्थितीशी झुंज देताना या दोघांचं नातं नवं वळण घेऊ लागलं आहे. त्याचं नातं नव्याने बहरू लागलं आहे. जान्हवी विभास मिळून कसे याला सामोरे जातील हे बघण उत्सुकतेचे असणार आहे. पण राखीला मात्र या बदल सहन होत नाहीये. ती या दोघांमध्ये दुरावा आणण्यासाठी आता नक्की कोणता कट रचणार ? पुढे मालिकेमध्ये काय घडणार ? हे बघणे इंट्रेस्टिंग ठरेल.

बातम्या आणखी आहेत...