आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी लावणी ऐकलीय का?:लहानग्याची 'चंद्रा' तुफान व्हायरल, जयेश खरेच्या व्हायरल व्हिडिओवर लाइक्सचा पाऊस

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या ग्रामीण भागात अनेक रत्ने दडली आहे. त्यातीलच एक रत्न म्हणजे हा चिमुकला जयेश खरे. मराठीतील गाजलेल्या 'चंद्रमुखी' या चित्रपटातील 'चंद्रा' हे गाणे खणखणीत आवाजात गाऊन त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे चंद्रमुखी या कादंबरीचे लेखक विश्वास पाटीलदेखील या मुलाच्या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सहावीत शिकणा-या जयेश खरेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

जयेश खरेचे शिक्षक कृष्णा राठोड यांनी ही मुळ पोस्ट शेअर केली होती. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, "श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, करजगाव या शाळेत बदली झाल्यानंतर इयत्ता सहावीच्या वर्गावर गेलो.विद्यार्थ्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील विशेष गुणांची तपासणी करत असताना जयेश खरे नावाच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम गाणं सादर केले.. गाणं ऐकल्यानंतर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक वाक्य आठवलं या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे," असे ते म्हणाले.

चिमुकल्या जयेशचा हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असून त्यावर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. वरील व्हिडिओवर क्लिक करा आणि तुम्हीही ऐका चिमुकल्याची खणखणीत आवाजातील ही लावणी...

बातम्या आणखी आहेत...