आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिजित बिचुकले हे नाव प्रेक्षकांना काही नवीन नाही. बिचुकले म्हटलं की सगळ्यात पहिला डोक्यात विचार येतो तो म्हणजे अफाट मनोरंजन. बिचुकले यांचे व्यक्तिमत्व हे प्रेक्षकांना रंजकपणे कोपरखळी देणारं आहे. बिचुकले टीव्हीवर आले की ते आता काय कल्ला करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. लवकरच बिचुकले टीव्हीवर येऊन कल्ला करणार आहेत. हो हे खरं आहे पण ते कल्ला करणार आहेत किचन कल्लाकारच्या किचनमध्ये.
अभिनेता जयवंत वाडकर आणि तृप्ती देसाई यांच्याबरोबर अभिजित बिचुकले यांची पाककलेची चुरस रंगणार आहे. नेहमीच वादाच्या गराड्यात अडकले बिचुकले पाककलेचे कसोटीत अव्वल ठरणार का? किचन कल्लाकारचा किताब बिचुकले यांना मिळणार का? हे प्रेक्षकांना 15 जून रोजी पाहायला मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.