आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्पा मोरया!:'जीव झाला येडापिसा' आणि 'राजा रानीची गं जोडी' मालिकांमध्ये गणरायाचे आगमन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • छोट्या पडद्यावर गणेशोत्सवाचा जल्लोष बघायला मिळणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल सगळीकडे लागली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी बाप्पाचे आगमन होणार आहे. सद्यस्थिती बघता विघ्नहर्त्याकडे हेच मागणे असणार आहे की, आपल्या सगळ्यांवर ओढवलेले हे संकट दूर होवो. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा आणि राजा रानीची गं जोडी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात होणार आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनाने सिध्दी - शिवा आणि संजीवनी – रणजीतच्या आयुष्यातील विघ्न देखील बाप्पाने दूर करावीत हीच मनोकामना बाप्पा चरणी मागणार आहेत.

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये लष्करेंच्या घरामध्ये बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे. शिवा घरच्या बाप्पाची स्थापना करणार आहे. सिध्दी आणि शिवाने बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. लष्करेंच्या घरात थाटामाटात आगमन तर होणार आहे पण या प्रसंगी शिवा आणि संपूर्ण कुटुंबाला एक सरप्राइज देखील मिळणार आहे. मोठ्या मनोभावे घरातील सगळ्यांनी पूजेची तयारी केली आहे. काकी, काका, बंट्या - बबल्या, मंगल, सिध्दी सगळेच या मंगल दिवशी घरामध्ये आहेत फक्त बाबा नसल्याने शिवा थोडा नाराज आहे. अचानक मिळालेल्या खास भेटीमुळे शिवा खुश होईल का? कोणाकडून आली असेल ही भेट? काय असेल त्यात? हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.

याचसोबत राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन होणार आहे. रणजीत आणि संजुचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव. त्यामुळे ढालेपाटलांच्या घरात काही वेगळाच उत्साह आहे. संजु आणि रणजीतने बाप्पासाठी विशेष तयारी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...