आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन एंट्री:'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये जेसिकाची एंट्री, कोण आहे ही जेसिका?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता मालिकेत जेसिका नावाच्या नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे.

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची आणि जोडीला परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं की नेहाला देखील तिचं यशवर प्रेम असल्याचं जाणवतंय. पण तिने अजून ही गोष्ट कबूल केली नाहीये.

आता मालिकेत जेसिका नावाच्या नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे. जेसिका ही व्यक्तिरेखा रशियन अभिनेत्री जेन कटारिया निभावत आहे. समीर जेसिका हि यशची एक्स गलफ्रेंड असल्याचं नेहाला सांगतो. जेसिकाच्या एंट्रीमुळे मालिकेत विलक्षण वळण येणार आहे. नेहाला या जेसिकामुळे होणारी जेलसी समीर हेरतो, हीच गोष्ट यशला देखील कळेल का? यशसाठी असलेलं प्रेम जेसिकाच्या येण्यामुळे नेहा व्यक्त करू शकेल का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...