'Jhimma' And 'Karkhanisanchi Wari' Best Film In Filmfare Marathi Awards 2022 , Siddharth Jadhav Got Black Lady For The First Time
फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स 2022:'झिम्मा' आणि 'कारखानीसांची वारी' ठरले सर्वोत्कृष्ट चित्रपट, सिद्धार्थ जाधवला पहिल्यांदाच मिळाली ब्लॅक लेडी; मराठी तारकांचा दिसला ग्लॅमरस लूक
4 महिन्यांपूर्वी
कॉपी लिंक
वाचा विजेत्यांची नावे -
फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स 2022 सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यंदाचे हे पुरस्कारांचे सहावे वर्ष आहे. या अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'झिम्मा' आणि 'कारखानीसांची वारी' या चित्रपटांनी बाजी मारली. तर अभिनेत्री सई ताम्हणकर आणि नेहा पेंडसे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला. सईला 'धुराळा' चित्रपटातील भूमिकेसाठी तर नेहाला 'जून' या चित्रपटातील भूमिकेसाठी गौरविण्यात आले.
या सोहळ्यात दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यंदाचा पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अमेय वाघ आणि सिद्धार्थ आनंद यांनी सांभाळली.
अभिनेता सिद्धार्थ जाधवने 'धुराळा'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळवला. विशेष म्हणजे सिद्धार्थने पोस्ट शेअर करत, 'माझं पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड... आणि पहिलं नेहमी स्पेशल असतं,' अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे.
पाहुया कुणीकुणी या पुरस्कारांवर उमटवली मोहोर -
सर्वोत्कृष्ट चित्रपट - झिम्मा आणि कारखानीसांची वारी (विभागून)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मंगेश जोशी (चित्रपट- कारखानीसांची वारी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अंकुश चौधरी (चित्रपट - धुरळा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सई ताम्हणकर (धुराळा) आणि नेहा पेंडसे (जून)
सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटिक्स - द डिसिपल आणि भोंगा
सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स - आदित्य मोडक (चित्रपट - द डिसिपल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स - सोनाली कुलकर्णी (चित्रपट - पेंशन) आणि नीना कुलकर्णी (चित्रपट - फोटो प्रेम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सिद्धार्थ जाधव (चित्रपट - धुराळा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सोनाली कुलकर्णी (चित्रपट - धुराळा) आणि गीतांजली कुलकर्णी (चित्रपट - कारखानीसांची वारी)
सर्वोत्कृष्ट पदार्पणातील अभिनेता - ऋतुराज वानखेडे (चित्रपट - जयंती) आणि विराट मोडके (चित्रपट - केसरी)
सर्वोत्कृष्ट पदार्पणातील अभिनेत्री - रेशम श्रीवर्धन (चित्रपट - जून)
सर्वोत्कृष्ट पदार्पणातील दिग्दर्शक - अमेर भारत देवकर (चित्रपट - मोरक्या) आणि नवीन देशबोईना (चित्रपट - लता भगवान कारे)
मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी - अभिनेत्री सुलोचना लाटकर
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - रमा देवकर (मोरक्या)
सर्वोत्कृष्ट संगीतकार - अमितराज (झिम्मा)
सर्वोत्कृष्ट गीतकार - गुरु ठाकूर (चित्रपट - प्रीतम, गाणे - कोणा मागे भिरभिरता)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - आदर्श शिंदे (चित्रपट -धुराळा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - अपेक्षा दांडेकर (चित्रपट - झिम्मा)
सर्वोत्कृष्ट कथा - अच्युत नारायण (चित्रपट - वेगळी वाट)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - एव्ही प्रफुल्लचंद्र (चित्रपट - धुराळा)
हा सोहळा येत्या 3 एप्रिल रोजी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर बघता येणार आहे.