आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिवर्ल्ड अपडेट:'जीव माझा गुंतला' मालिकेत अंतराला मिळणार 'हमसफर'ची साथ!, अंतरा रिक्षा पुन्हा एकदा चालविण्याचा घेतला निर्णय

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता पुन्हा एकदा अंतराला हमसफरची साथ मिळणार आहे.

कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेमध्ये अंतरा आणि 'हमसफर'चं नातं खूप खास आहे. आजवर तिच्या आयुष्यात ज्या अडचणी आल्या, तिच्या मनात ज्या भावना होत्या त्या सगळ्या तिने हमसफरला सांगितल्या. जे कठीण प्रसंगी आले त्यावेळेस हमसफरची साथ तिला लाभली. हमसफर ही फक्त एक रिक्षा नसून अंतराच्या खूप जवळची, तिच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणूनचं तिने तिच्याकडे आजवर पहिलं. पण, खानविलकरांच्या घरी जेव्हा अंतरा सून म्हणून गेली तेव्हा कुठेतरी प्रेक्षकांना वाटलं आता हमसफर आणि अंतराची साथ तुटणार.

परंतु तसं नसून आता पुन्हा एकदा अंतराला हमसफरची साथ मिळणार आहे. शितोळे परिवाराला पैशांची कमतरता भासू नये, आई वडिलांना कुठलाही तरस होऊ नये म्हणून अंतरा रिक्षा पुन्हा एकदा चालविण्याचा निर्णय घेणार आहे. लग्न झाल्यावर आपल्या माहेरी हातभार लावावा, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे प्रत्येक मुलीला वाटतं असते आणि तशीच इच्छा आपल्या अंतराची देखील आहे.

अंतरा रिक्षा चालविण्याचा जेव्हा निर्णय घेते तेव्हा ती सुवासिनी यांना सांगण्याचा प्रयत्न देखील करते आणि ती तसं सांगते देखील. पण तसं करून सुध्दा त्या दोघींमध्ये गैरसमज का होतो ? सुवासिनी आणि अंतरा मध्ये गैरसमज दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मल्हारने देखील अंतराला अजून बायको म्हणून स्वीकारले नाहीये. अंतरा कुठेतरी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्या सगळ्यामध्ये आता हे नवं संकट तिच्यासमोर उभे ठाकणार आहे. अंतराच्या या निर्णयाचा मल्हार आणि अंतराच्या नात्यावर काय परिणाम होईल ? हे मालिकेच्या येणा-या भागात कळेल.

बातम्या आणखी आहेत...