आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोण आहे वनिता खरात?:'कबीर सिंग'मध्ये शाहिदसोबत झळकली आहे वनिता, कॅलेंडर फोटोशूट बघून आईवडिलांची होती 'ही' प्रतिक्रिया

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकारात्मक संदेशासह वनिताने हे फोटोशूट केले असून यासाठी तिचे कौतुक होत आहे.

'कबीर सिंग' या चित्रपटात शाहिद कपूर मोलकरणीच्या मागे पळत असल्याचं दृश्य आठवतंय का? तो जिच्या मागे धावताना दिसला ती आहे एक मराठमोळी अभिनेत्री. वनिता खरात हे तिचे नाव आहे. अवघ्या काही मिनिटांच्या या दृश्यातून वनिता प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. आता पुन्हा एकदा वनिता एका खास कारणाने चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे. सकारात्मक संदेशासह तिने हे फोटोशूट केले असून यासाठी तिचे कौतुक होत आहे.

वनिताने फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करताना त्यासह लिहिले, “मला माझ्या गुणवत्तेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे. कारण मी मी आहे…!!! त्याचबरोबर #bodypositivity असा हॅशटॅगही तिने वापरला आहे.

खास गोष्ट म्हणजे हे फोटोशूट करण्यापूर्वी तिने आपल्या आईवडिलांना याविषयी काहीही सांगितले नव्हते. मात्र जेव्हा तिच्या पालकांनी हे फोटोशूट पाहिले, तेव्हा त्यांना तिचा अभिमान वाटला. याविषयी स्वतः वनिताने एका मुलाखतीत सांगितले आहे.

काय होती पालकांची प्रतिक्रिया?
मुलाखतीत वनिताने सांगितले, 'खरं सांगायचं तर मी सुरुवातीला माझ्या पालकांना यासंदर्भात काहीही सांगितले नव्हते. फोटोशूट केल्यानंतर मी त्यांना याविषयी सांगितले. त्यांनीही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. त्यांना माहित आहे की हे माझे काम आहे आणि हा तुझ्या कामाचाच एक भाग आहे, असे ते मला म्हणाले. फोटो चांगला आल्याचे त्यांनी आवर्जुन मला सांगितले.'

तेजस नेरुरकने क्लिक केला फोटो
वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. याविषयी वनिता म्हणाली, 'ही अभिजीत पानसे यांची संकल्पना होती. मी त्यांना पुर्वीपासून ओळखते. आपण सर्व सुंदर आहोत, ही कॅलेंडरची संकल्पना आहे. आपल्या शरीरावर प्रेम करा, यासाठी ते गोरे किंवा सडपातळ असण्याची गरज नाही. आपण जसे आहोत, तसे सुंदर दिसतो, हा मेसेज देण्याचा आम्ही यातून प्रयत्न केला आहे.'

कोण आहे वनिता खरात?
वनिता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक रिअॅलिटी शो, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ' महाराष्ट्राची हास्यजत्रा' या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोची वनिता विजेती आहे. 'विक्की वेलिंगकर' या चित्रपटातही ती झळकली आहे. 'थोडं तुझं थोडं माझं' हे नाटकदेखील तिने केलं आहे. शाहिद कपूरच्या गाजलेल्याल्या 'कबीर सिंग' या चित्रपटात तिने शाहिद कपूरची मोलकरीण पुष्पाची भूमिका साकारली होती.

बातम्या आणखी आहेत...