आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटा पडदा:'डॉक्टर डॉन' मालिकेत 'या' कारणामुळे कबीर बनला आजीबाई, राधाला कळणार का सत्य!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेत अभिनेता अनुराग वरळीक कबीरची व्यक्तिरेखा साकारतोय.

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'डॉक्टर डॉन' या मालिकेत आता एक नवा ट्विस्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या मालिकेतील प्रेक्षकांची एक आवडती जोडी म्हणजे राधा आणि कबिरची. कबीर हा तर तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पण कबीरच एक नवीन रूप मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका सीनच्या चित्रीकरणासाठी कबीरने चक्क आजीचा वेष धारण केला आहे. त्याच्या या गेटअप मधील फोटो त्याने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काय आहे लेटेस्ट ट्रॅक?
राधा आणि कबीरचं भांडण झालं असल्या कारणामुळे राधा कबीरला घरी घेत नाही. कबीरला राधाचा सहवास मिळावा म्हणून तो आजीचा वेष धारण करून तिच्या घरी जाऊन नातेसंबंध कसे जपावेत याबद्दल समजावतो. आजीचं बोलणं ऐकून राधाला तिची चूक समजते. आता ती कबीरसोबत पॅचअप करणार का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

या वेगळ्या भूमिकेबद्दल बोलताना कबीर म्हणजेच अभिनेता अनुराग वरळीकर म्हणाला, "डॉक्टर डॉन या मालिकेमुळे कबीर हा घराघरात पोहोचला आणि प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनला. आता मी आजीच्या गेटअप मध्ये प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या वेषभूषेसाठी टीमने खूप मेहनत घेतली आहे. पण प्रेक्षकांना ही आजी बघताना नक्की मजा येईल."

बातम्या आणखी आहेत...