आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री गंगाला अज्ञातांकडून रस्त्यात मारहाण, व्हिडिओ शेअर करत सांगितली आपबिती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वत: गंगाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपबिती कथन केली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मधील अभिनेत्री गंगा हिला मुंबईतील रस्त्यावर काही लोकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वत: गंगाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपबिती कथन केली आहे.

‘कारभारी लयभारी’ मालिकेत गंगा रोजच्या प्रमाणे चित्रीकरण संपवून घरी जायला निघाली होती. नेहमी प्रमाणे ती बसस्टॉपवर बसची वाट पाहात बसली होती. दरम्यान काही लोकं तेथे आले आणि त्यांनी तिला विनाकारण मारहाण करायला सुरुवात केली. गंगा कशीबशी रिक्षा पकडून तेथून घरी पोहोचली. रिक्षामध्ये बसल्यानंतर तिने रडतरडत हा व्हिडिओ शूट केला आहे. गंगाला मारणार कोणी केली? का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गंगाने काय सांगितले?
‘मी नेहमी प्रमाणे बस स्टॉपवर बसची वाट पाहात होते. अचानक तेथे काही मुले आली आणि मला विनाकारण मारहाण करु लागली. मी काय करु? कुठे जाऊ? कोणाची मदत घेऊ? प्लीज मला सांगा’ असे गंगा रडत व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे.

ट्रान्सजेंडर आहे गंगा
‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोमधून गंगा लोकप्रिय झाली आहे. गंगा ही एक ट्रान्सजेंडर असून तिचे खरे नाव प्रविण हाटे आहे. ती सध्या 'कारभारी लयभारी' या मालिकेत गंगा ही भूमिका साकारत आहे. गंगाचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय कठिण होता. डान्सिंग क्वीन या शोच्या मंचावर गंगाने तिच्या खडतर प्रवासाविषयी सांगितले होते. 'हाटे कुटुंबात पहिला मुलगा जन्माला आला तो मीच. जन्माला मुलगा आला पण तो आत्मा एका मुलीचा होता. मला लहानपणापासून एक सुंदर मुलगी होण्याची इच्छा होती. मी बाहेर कधी मुलांमध्ये खेळायला जायची तेव्हा हा बायल्या आहे असे म्हणत चिडवायचे,' असे गंगाने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...