आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाची खास भेट:लग्नात कार्तिका गायकवाडला वडिलांनी भेट दिली Mercedes E Class, फोटो शेअर करत म्हणाली...

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिसेंबर महिन्यात कार्तिकी लग्नाच्या बेडीत अडकली.

सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती व लाईव्ह शो करणारी कार्तिकी गायकवाडने आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात कार्तिकी विवाहबंधनात अडकली. पुण्याच्या रोनित पिसेसोबत कार्तिकीचे लग्न झाले आहे. राजेशाही थाटात कार्तिकी आणि रोनितचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. लग्नानंतर कार्तिकीने या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. नुकताच कार्तिकीने लग्नातील एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन कार्तिकीने तिचे वडील कल्याणजी गायकवाड यांनी लग्नाच्या निमित्ताने तिला आणि रोनितला दिलेली खास भेट दाखवली आहे.

मर्सिडीज ई क्लास ही गाडी दिली भेट
कल्याणजी गायकवाड यांनी आपल्या लेकीला लग्नात मर्सिडीज ई क्लास ही लग्झरी कार भेट म्हणून दिली आहे. कार्तिकीने फोटो शेअर करुन, 'रोनित आणि मला बाबांनी दिलेली ही भेट,' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत तिच्यासोबत तिचे वडील आणि दोन्ही भाऊ दिसत आहेत. या लग्झरी कारची किंमत 60 लाखांपासून सुरु होते.

कार्तिकीने साजरी केली पहिली मकर संक्रांत

लग्नानंतर कार्तिकीने पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे. कार्तिकीने यावेळी हिरवी साडी आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधान केले. कार्तिकीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नेटकऱ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

सारेगमप लिटिल चॅम्स मराठीच्या पहिल्या पर्वाची कार्तिकी विजेती ठरली. कार्तिकी सध्या गायिका म्हणून आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कार्तिकी 'गजर कीर्तनाचा' या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून प्रेक्षकांसमोर आली होती.

बातम्या आणखी आहेत...