आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बदलाचं स्वागत:नव्या शैक्षणिक धोरणाचं केदार शिंदे आणि डॉ. अमोल कोल्हेंकडून स्वागत, म्हणाले - 'आता मुलांची रॅट रेस संपवा'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मराठी चित्रपटसृष्टीकडूनदेखील स्वागत करण्यात आलं आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला 29 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावी बोर्डचे महत्व आता कमी होणार आहे. 10+2 ऐवजी 5+3+3+4 पॅटर्न होणार आहे. तसंच दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.

या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मराठी चित्रपटसृष्टीकडूनदेखील स्वागत करण्यात आलं असून त्यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं स्वागत करतं आपली भूमिका मांडली आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी बदलाचं स्वागत करायला हवं, असं ट्विट केलं आहे. 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - बदलाचं स्वागत करायला हवं.. अपेक्षा हीच की विद्यार्थ्यांची रॅट रेस संपून “बच्चा, कामयाब नहीं काबिल बनो, कामयाबी अपनेआप कदम चूमती है!” हे प्रत्यक्षात येईल.. तूर्त एवढंच कारण ‘अभ्यासोनि प्रकटावे’, असं ते म्हणाले आहेत.

तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही दहावी बारावीचा ‘तेरावा’ घातला, आता…, असे म्हटले आहे. 'दहावी बारावीचा “तेरावा” घातला... शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो', असं केदार शिंदे म्हणाले आहेत.

शालेय शिक्षणाची रचना आता 10+2 ऐवजी 5+3+3+4 अशी झाली आहे. पहिली तीन वर्षे पूर्व प्राथमिक, त्यानंतर दोन वर्षे पहिली व दुसरी, पुढील तीन वर्षे तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी आणि अखेरची चार वर्षे नववी ते बारावी अशा 15 वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आले आहे. 34 वर्षांनी शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी 1986 मध्ये भारतात प्रथम राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात आले होते.