आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते लवकरच गाजलेल्या 'जत्रा' या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. आज त्यांनी 'जत्रा 2' या चित्रपटाची घोषणा केली आहे. जत्रा या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 16 वर्षांचा कालावधी लोटला आहे. पण आजही या चित्रपटाची जादू कायम आहे. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडेकर यांच्यासोबतच कुशल बद्रिके, संजय खापरे यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. 'जत्रा 2' मध्येदेखील भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके, संजय खापरे हे कलाकार झळकणार आहेत.
सोशल मीडियावर 'जत्रा 2'चे मोशन पोस्टर शेअर करत केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "ह्यालगाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली त्याला 16 वर्षांहून जास्त काळ लोटलाय.. कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.. पण अजूनही तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे! म्हणूनच या गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय.. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवलं आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय.. या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला 'जत्रा 2' येतोय! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! अलबत्या गलबत्या कोण फोडेल..."
'जत्रा' या चित्रपटातील गाणी 'कोंबडी पळाली' आणि 'ये गं ये ये मैना' तुफान गाजली होती. या चित्रपटाच्या उदंड यशानंतर आता नववर्षात 'जत्रा 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.