आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाचा 24वा वाढदिवस:केदार शिंदेंनी पत्नीसाठी लिहिली इमोशनल पोस्ट, म्हणाले - सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊनचा अनुभव लग्नाआधी आणि लग्नानंतरही आपण घेतलाय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेला आणि केदार यांचे लव्ह मॅरेज आहे.

मराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी मोहोर उमटवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. त्याचे कारण म्हणजे आज (9 मे) त्यांच्या लग्नाला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. बेला शिंदे हे त्यांच्या बेटरहाफचे नाव. केदार यांनी सोशल मीडियावर बेला यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर करुन त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो शेअर त्यांनी पत्नीसाठी एक भावूक पोस्टही लिहिली आहे. केदार लिहितात, ''आज आपल्या लग्नाला 24 वर्ष पुर्ण झाली. खरंतर तू पळून जाऊन लग्न करण्याच्या निर्णयाला होकार दिलास, तेव्हा या क्षेत्रात मी धडपड करत होतो. तुझं आयुष्यात येणं माझ्यासाठी भाग्यशाली ठरलं. म्हणजे एकाच रात्रीत आकाशाला हात लागले असं नाही. मात्र एक दिशा मिळाली पुढच्या प्रवासाची. आजही आपण धडपडतोच आहोत. स्वामी कृपेने दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था चोख आहे. मात्र, तुझी खुप स्वप्न पूर्ण करण्यात मी तोकडाच पडतोय. माझा ECG सारख्या करीयर ग्राफ! तू नेहमीच प्रत्येक चढ उतार क्षणी,साथ देतेयसं!! स्वामी म्हणतात, “ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” आणि तुझं म्हणणं असतं “मी तुझ्या सोबत आहे”. तुम्हा दोघांच्यामुळेच मी पुढची वाटचाल करणार आहे. खुप वर्ष एकत्र राहू! Social distancing, lockdown या सगळ्या गोष्टींचा अनुभव लग्नाआधी आणि लग्नानंतर आपण घेतलाय. मला “सना” सारखं गोड स्वप्न प्रत्यक्षात दिलस. तुम्हा दोघांसाठीच आयुष्यभर जगेन, धडपडेन...'

View this post on Instagram

आज आपल्या लग्नाला २४ वर्ष पुर्ण झाली. खरतर तू पळून जाऊन लग्न करण्याच्या निर्णयाला होकार दिलास, तेव्हा या क्षेत्रात मी धडपड करत होतो. तुझं आयुष्यात येण माझ्यासाठी भाग्यशाली ठरलं. म्हणजे एकाच रात्रीत आकाशाला हात लागले असं नाही. मात्र एक दिशा मिळाली पुढच्या प्रवासाची. आजही आपण धडपडतोच आहोत. स्वामी कृपेने दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था चोख आहे. मात्र, तुझी खुप स्वप्न पूर्ण करण्यात मी तोकडाच पडतोय. माझा ECG सारख्या करीयर ग्राफ! तू नेहमीच प्रत्येक चढ उतार क्षणी,साथ देतेयसं!!स्वामी म्हणतात “ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” आणि तुझं म्हणणं असतं “मी तुझ्या सोबत आहे”. तुम्हा दोघांच्यामुळेच मी पुढची वाटचाल करणार आहे. खुप वर्ष एकत्र राहू! Social distancing, lockdown या सगळ्या गोष्टींचा अनुभव लग्ना आधी आणि लग्नानंतर आपण घेतलाय. मला “सना” सारखं गोड स्वप्न प्रत्यक्षात दिलस. तुम्हा दोघांसाठीच आयुष्यभर जगेन, धडपडेन.....

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on May 8, 2020 at 11:34am PDT

बेला आणि केदार यांचे लव्ह मॅरेज

पडद्यावर प्रेमाची विविध रुपे साकारणा-या केदार केदार यांनी लव्ह मॅरेज केले आहे. केदार यांच्या प्रेमाची कहाणीसुद्धा इंट्रेस्टिंग आहे. भेटणे, एकमेकांना पाहणे आणि प्रेमात पडणे अशा सरळ मार्गाने केदार आणि बेला यांचे प्रेम जमले नाही. ‘लोकधारा’च्या निमित्ताने केदार आणि बेला यांची ओळख झाली होती. बेला यांची थोरली बहीण ‘लोकधारा’च्या ग्रुपमध्ये डान्स करायची. एकेदिवशी बेला आपल्या बहिणीचा डान्स पाहायला गेल्या. बेला यांनाही नृत्याची आवड असल्याने त्यासुद्धा या ग्रुपमध्ये सामील झाल्या. त्यावेळी तिथे केदार डान्स शिकवायचे. याचकाळात केदार आणि बेला यांची चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीदरम्यानच त्यांच्यात प्रेम फुलायला लागले होते. केदार यांनीच बेला यांना पहिल्यांदा प्रपोज केले होते. मात्र त्यावेळी बेला यांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. मात्र केदार यांनी हार पत्करली नाही. सतत दोन वर्षे ते बेला यांच्या मागे होते. अखेर बेला यांनी केदार यांच्या प्रेमाचा स्वीकार केला.  

केदार यांच्या खांद्याला खांदा लावून करतात काम... 

बेला शिंदे यांनी सोशॉलॉजी या विषयात पदवीप्राप्त केली आहे. शिवाय त्या भरतनाट्यम शिकल्या आहेत. लग्नानंतर बेला यांनी केदार यांना त्यांच्या कामात मदत करायला सुरुवात केली. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेपासून त्यांचे केदार यांच्यासोबत प्रॉडक्शनचे काम सुरु झाले. आता बेला शिंदे या निर्माती म्हणून नावारुपास आल्या आहेत.   

असे सुरु झाले केदार शिंदेचे करिअर

केदार शिंदे हे शाहीर साबळ्यांचा नातू आहेत. त्यांनी 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती. केदार शिंदे यांनी 'बॉम्बे-ए-मेरी-जान' या नाटकाने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्यांच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' ह्यांचा समावेश होतो. 

टीव्ही इंडस्ट्रीत एन्ट्री

नाट्यसृष्टीत भरघोस यश मिळवल्यानंतर त्यांनी दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलं. इथेही त्यांनी 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय' या झी मराठीवरील मालिकांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. 

'अगं बाई अरेच्चा' होता पहिला सिनेमा

त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे 'अगं बाई... अरेच्या'. मराठी चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच आयटम साँगचा वापर केला. या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शिका फराह खान हिने केलं होतं. या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. त्यानंतर केदार यांनी 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे', 'अगं बाई अरेच्चा 2' यांसारखे हिट चित्रपट दिले.

एका मुलाखतीत पत्नी बेलाविषयी केदार शिंदे म्हणाले होते, ''माझी पत्नी ही माझी खूप समंजस अशी रसिक सहचर आहे. ती, मी, व आमची मुलगी सना असं आमचं कुटुंब आहे. माझी बायको माझी उत्तम प्रेक्षक आहे. मला काही सुचत असतं तेव्हा माझ्या संकल्पना मी तिला सांगतो. अगदी अर्ध्या रात्री झोपेतून उठवूनसुध्दा तिला मी माझं लिखाण वाचून दाखवलं आहे. तीदेखील 'अमूक एक थीम चांगली आहे, किंवा वाईट आहे' तर कधीकधी नुसतंच हसून आवडलं, किंवा छान अशा प्रतिक्रिया देते.''

बातम्या आणखी आहेत...