आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी सुरुवात:केदार शिंदे घेऊन येत आहेत 'सुखी माणसाचा सदरा', म्हणाले -  रोज टीव्ही पाहून तुम्हाला रात्री शांत निरागस झोप लागावी म्हणून मालिका आणतोय

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज केदार यांनी एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करुन त्याला नवी सुरुवात... असे कॅप्शन दिले आहे.

'श्रीयुत गंगाधर टिपरे'सारखी अतिशय लोकप्रिय झालेली मालिका प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे आता प्रेक्षकांसाठी नवी कलाकृती घेऊन येत आहेत. 'सुखी माणसाचा सदरा' हे त्यांच्या नव्या मालिकेचे शीर्षक असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर जुन्या गोष्टींचे फोटो अपलोड करून, त्या गोष्टी आपल्या सामान्यांच्या आठवणीत कशा राहिल्या आहेत याबद्दल केदार लिहित आहेत.

अलीकडेच त्यांनी चिंच, बोरं, आवळ्याचा फोटो शेअर करुन लिहिले होते, ''शाळेबाहेर जे स्टाॅल लागायचे, त्या चिंचा बोरं आवळा इत्यादी गोष्टींवर ताव मारत घरचा प्रवास सुखावह व्हायचा. आज सगळं online! प्रगती हवी पण जगण्यातली निरागसता मरता कामा नये. रोज TV पाहून तुम्हाला रात्री शांत निरागस झोप लागावी म्हणून मालिका आणतोय. गुरूवारी तपशील देईनच. श्री स्वामी समर्थ.''

शिवाय आजदेखील त्यांनी एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करुन त्याला नवी सुरुवात... असे कॅप्शन दिले आहे.

एका साध्या, सर्वसामान्य माणसाची गोष्ट सांगणारी मालिका केदार घेऊन येत आहेत. 'सुखी माणसाचा सदरा' ही मालिका दसऱ्याच्या मुहूर्तावर कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. यात भरत जाधव, रोहिणी हट्टंगडी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचे समजते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser