आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्या आणि खडसेंची जुगलबंदी:टीव्ही शोमध्ये राऊतांचा फोटो पाहताच गालात हसले किरीट सोमय्या, म्हणाले- साफ-सफाई सुरू आहे! तर फडणवीसांचा फोटो पाहून खडसे म्हणाले- दुश्मन!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या शोचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.

सध्या सोशल मीडिया असो अथवा टीव्ही वाहिन्या सगळीकडे दोनच चेहरे प्रामुख्याने पाहायला मिळतात ते म्हणजे संजय राऊत आणि किरीट सोमय्या. त्यांची जुगलबंदीच दिवसभर पाहायला मिळते. त्यात आता झी मराठी वाहिनीवरील 'किचन कल्लाकार' कार्यक्रमातही यासंदर्भातली मजा पाहायला मिळाल्याचे समोर आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधणारे नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे आणि सध्या INS विक्रांत प्रकरणी चर्चेत असलेले किरीट सोमय्या सहभागी झाले आहेत. महिन्याभरापूर्वी खडसे आणि सोमय्या यांनी या शोचे चित्रीकरण पूर्ण केले होते. आता या शोचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यात खडसे आणि सोमय्या यांनी गळाभेट घेत त्यांच्यातील मैत्री कायम असल्याचे दाखवले.

किचन कल्लाकारच्या मंचावर खडसे आणि सोमय्या यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळाली. यावेळी दोघांनीही राजकारणातील जुन्या मित्रांना टोलेही लगावले. दोघांनी मंचावर 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे' हे गाणे एकत्र गायले. तर एका टास्कदरम्यान खडसेंना देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला गेला आणि त्यांना बघून कोणते गाणे सुचते असे विचारता, त्यांनी 'दुश्मन ना करे दोस्त ने जो काम किया है...' हे गाणे गायले. यानंतर दोघांनाही संजय राऊतांचा फोटो दाखवला गेला. यावर खडसेंनी 'आ देखे जरा किसमें कितना है दम' हे गाणे गायले. तर सोमय्या यांनी गाणे न म्हणता, साफसफाईला सुरुवात केलीये, असा टोला लगावला.

पहा व्हिडिओ...

कार्यक्रमात खडसेंनी सोमय्यांना जरा जपून राहण्याचा सल्लाही दिला. आज सुपात असलेले उद्या जात्यात असतात त्यामुळं काळजी घ्या असे खडसे म्हणाले. सोमय्या आणि खडसे यांच्या गप्पांची मैफल प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असे म्हणायला हरकत नाही.